रेशीम शेतीचे अर्थशास्त्र

Abaso Hariba Shinde

Abstract


      भारतातील 22 राज्‍यात रेशील उद्योग सुरू आहे.  महाराष्‍ट्रा राज्‍यात सन 1997 मध्‍ये रेशीम संचालनालयाची स्‍थापना झाली.  सन 2009-10 च्‍या आकडेवारीनुसार 7,614 शेतक-यांनी 9,743 एकर जमिनिवर 1,661 मे. टन रेशीम कोष उत्‍पादन घेतले आहे.  रेशीम कोषापासून धागाव धाग्‍यापासून रेशीम वस्‍त्र, वेगवेगळ्या वस्‍तु फॅशन डिझायनिंग अथवा गालीचे, घरामधील सजावटीपासून ते धार्मिक कार्यात आणि वैद्यकीय क्षेत्रापासून ते पॅराशूट तयार करण्‍यापर्यंत रेशीम धाग्‍याचा वापर सर्वत्र आढळून येतो.  रेशीम उद्योग म्‍हणजे ‘रेशीम अळयांचे संगोपन करून रेशीम कोषाची निर्मिती करणे यालाच रेशीम उद्योग असे म्‍हणतात.’

      शेतक-यांने आपल्‍या शेतजमिनीवर तुती लागवड करून रेशीम कोषासाठी रेशीम अळी संगोपन गृहाची उभारणी योग्‍य पध्‍दतीने केल्‍यास 15-20 वर्षेया व्‍यवसायास भांडवली खर्च पुन्‍हा करावा लागत नाही.  शेतक-याने तुती लागवड करून उत्‍पादित केलेले रेशीम कोष शासनास वाजवी दराने विकून एकरी वार्षीक खर्च वजा साठ हजारा पेक्षाजास्‍त उत्‍पन्‍न मिळविता येते.  त्‍याचप्रमाणे कमी पाण्‍याच्‍या जमिनीवर देखील पटटा पध्‍दतीने तुती पाला उत्‍पादन घेउन रेशीम कोष्‍चे उत्‍पादन घेता येते यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. 


Keywords


रेशीम उद्योग; रेशीम कोष; रेशीम शेती; तुती; तुती लागवड

Full Text:

PDF

References


हमखास पैसा देणारी रेशीम शेती : संजय फुले, सकाळ पेपर्स प्रा.लि. 595, पुणे , 2 एप्रिल 2012

रेशीम उदयोग: रवींद्रम.काटोल, गोडवा कृषी प्रकाशन, पुणे – 09 नोव्हेंमबर 2007, 01 सप्टें बर 2011.

किमयार रेशीम शेतीतून लक्षाधिश होण्या.ची : कॅप्टीन डॉ. एल.बी. कलंत्री, रेशीम संचालनालय, म.रा.नागपूर प्रकाशन,07 डिसेंबर 2009

रेशीम उदयोग माहिी पुस्तीशका: रेशीम संचालनालय, नागपूर – 09 सन 2003-2004

अर्थसंवाद : मराठी अर्थशास्त्र परिषदेचे त्रैमासिक, जुलै – सप्टें बर 2012, खंड 36

संशोधन पध्द ती व तंत्रे : डॉ. प्रदिप आगलावे, साईनाथ प्रकाशन, 2000

www.mahasilk.gov.in

www.agrowon.com


Refbacks

  • There are currently no refbacks.


Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 3.0 License.